PMC Bharti 2025 | पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका | फसवणूक झाल्यास  प्रशासन जबाबदार राहणार नाही | पुणे महापालिकेकडून जाहीर आवाहन

Homeadministrative

PMC Bharti 2025 | पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका | फसवणूक झाल्यास  प्रशासन जबाबदार राहणार नाही | पुणे महापालिकेकडून जाहीर आवाहन

Ganesh Kumar Mule Aug 18, 2025 3:06 PM

Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 
Maharashtra Vidhansabha Election | विधानसभा निवडणूक मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
PMC Kamla Nehru Hospital | पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २४ तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची भरती केली जाणार | महापालिकेकडून जाहिरात जारी

PMC Bharti 2025 | पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका | फसवणूक झाल्यास  प्रशासन जबाबदार राहणार नाही | पुणे महापालिकेकडून जाहीर आवाहन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका. फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corportion Recruitment 2025)

 

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/l/recruitment यावर ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येऊन पारदर्शकरित्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.

याद्वारे सर्व नागरिकांना/ उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. कायम नोकरी मिळेल असे सांगणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत. तसेच कंत्राटी कर्मचारी देखील विशिष्ट कालावधीसाठी नियुक्त केले जातात. त्यांना कायम करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अथवा योजना अस्तित्वात नाही. कोणी व्यक्ती नोकरी संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैसे मागणी अथवा खोटी माहिती देत असल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ संबधित विभागाला द्यावी. तरी, कोणत्याही मध्यस्थ/ दलाल / परिचित / अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती व सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नागरिकांनी/ उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करून घ्यावी. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: