PMC Additional Commissioner | महसूलवाढ सुधारणा कक्ष आता अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) यांच्या अखत्यारीत!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक स्त्रोतांचे बळकटीकरण व उपाययोजनांसाठी २०२० साली अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली “महसूलवाढ सुधारणा कक्ष” स्थापन करण्यात आला होता. तथापि, कक्षातील नियुक्त काही सदस्य दरम्यानच्या काळात सेवानिवृत्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सदर महसूल वाढ कक्ष अति. आयुक्त (इस्टेट) यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त यांनी याला मान्यता प्रदान केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
खालीलप्रमाणे “महसूल वाढ सुधारणा कक्ष ” गठीत करण्यात आला आहे.
अति.महा. आयुक्त (इस्टेट) – अध्यक्ष
मुख्य लेखा व वित्त अधिकारी – सदस्य सचिव
शहर अभियंता – सदस्य
मुख्य अभियंता (पाणी पुरवठा) – सदस्य
उप आयुक्त (मिळकत कर ) – सदस्य
उप आयुक्त ( मालमत्ता व्यवस्थापन) – सदस्य
उप आयुक्त (आकाशचिन्ह) – सदस्य
मुख्य अग्निशमन अधिकारी – सदस्य

COMMENTS