PMC Additional Commissioner on NOC | चुकीच्या पद्धतीने NOC दिल्यास खाते प्रमुखांवर होणार कारवाई | अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 

Homeadministrative

PMC Additional Commissioner on NOC | चुकीच्या पद्धतीने NOC दिल्यास खाते प्रमुखांवर होणार कारवाई | अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 

Ganesh Kumar Mule Dec 19, 2025 11:31 AM

Pune News | नैसर्गिक ओढे – नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात नोंदवले गुन्हे
Pune Theur Rain | पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले | थेऊर परिसरातील रूपे वस्तीतील घटना
PMC Education Department | गुणवंत शिक्षकांवरच शिक्षण विभागाची मदार | मुरलीधर मोहोळ

PMC Additional Commissioner on NOC | चुकीच्या पद्धतीने NOC दिल्यास खाते प्रमुखांवर होणार कारवाई | अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  प्रशासनाने इच्छुक उमेदवार यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सत्वर मिळणेकामी ‘थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र कक्ष’ तयार करणेत आलेला आहे. दरम्यान समन्वयकाद्वारे चुकीच्या पद्धतीने ना हरकत मान्य किंवा अमान्य केल्यास त्या बाबीस सर्वस्वी खाते प्रमुख जबाबदार राहतील. असा इशारा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025-26)

निवडणुकीसाठी  इच्छुक उमेदवार यांना ‘थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली असून यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये मनपाच्या सर्व खात्यांतर्गत समन्वयकाची नेमणूक खाते प्रमुख यांचे स्वाक्षरीने करण्यात आली आहे. संगणक प्रणालीमध्ये समन्वयकांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवार यांना थकबाकी नसल्याचा दाखला देणे बाबतचा निर्णय आपले वतीने मान्य किंवा अमान्य करण्याचे अधिकार समन्वयक यांचेकडे दिलेले आहेत.

हे  कामकाज हे जबाबदारीचे असून कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे सर्व खाते प्रमुख यांना सुचित करण्यात आले आहे कि,  कार्यरत ‘समन्वयक यांची बैठक घेऊन इच्छुक उमेदवार यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देताना खात्यांतर्गत चौकशी करून कशाप्रकारे ना हरकत मान्य किंवा अमान्य करावी याबाबत कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी. समन्वयकाद्वारे चुकीच्या पद्धतीने ना हरकत मान्य किंवा अमान्य केल्यास त्या बाबीस सर्वस्वी खाते प्रमुख जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. असा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

प्राप्त होणाऱ्या अर्जावरील निर्णय शक्यतो त्याच दिवशी घेऊन प्रणालीमधून पुढे पाठविण्यात यावा. कोणत्या विभागाकडे अर्ज आहे हे अर्जदारांना प्रणालीमधून पाहता येऊ शकते. रोज प्रलंबित राहिलेल्या अर्जवाबत खातेप्रमुखांनी स्वतः रोजच्या रोज आढावा घेऊन निकाली काढण्याबाबत उचित कार्यवाही करावी. विशेषतः नाम निर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे  ३० डिसेंबर रोजी प्राप्त होणारे अर्ज त्याच दिवशी दुपारी १.०० वाजण्यापूर्वी निर्णय घेणे आवश्यक राहील. असे देखील अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0