PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार

HomeपुणेPMC

PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार

गणेश मुळे Feb 16, 2024 2:22 AM

Additional Commissioner | PMC Pune | महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातून अतिरिक्त आयुक्त पद निसटले! | भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती
PMC Additional Commissioner DPC | पदोन्नती समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला?
Only two officers left in the race for the post of PMC Additional Municipal Commissioner!

PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार

PMC  Additional Commissioner | पुणे | महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदावर  महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी महापालिका सामान्य प्रशासन विभागाने (PMC Général Administration Department) राज्य सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश होता. आता यातून वाघमारे आणि बोनाला यांनी माघार घेतली आहे. दरम्यान या यादीवर रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी याआधीच आक्षेप घेतला होता. शेलार यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर दावा केला असून आपले नाव या पदासाठी डावलल्याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. प्रधान सचिवांनी याची दखल घेतली आहे. अशी माहिती रमेश शेलार यांनी दिली. (Pune Municipal Corporation Additional Commissioner)
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पदनियुक्त केले जाणार आहे. (PMC Pune)
दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीवर उपायुक्त रमेश शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. सेवा नियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार आपणच या पदासाठी पात्र ठरत आहोत, असा दावा शेलार यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त पदाच्या यादीत आपले नाव समाविष्ट करणे आवश्यक होते. असे शेलार यांनी म्हटले आहे. शेलार यांनी तक्रारीत म्हटले आहे कि, वास्तविक १: ५ या तत्त्वानुसार ५ अधिकारी यांचे नावांची शिफारस झालेली दिसून येत नाही. कारण यापूर्वी पाठविलेल्या यादीतील अधिकारी वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच सुयोग्य अधिकारी निवड यादीमध्ये मुख्य उद्यान अधिकारी, मुख्य विधी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, समाज विकास अधिकारी व समकक्ष पदावरील अधिकारी यांचा समावेश होवू शकेल. यादी मधील असलेल्या नावांमध्ये नवीन ‘सुयोग्य अधिकारी यांची नावे समाविष्ठ होवून सेवाजेष्ठतेनुसार यादी महापालिकेकडून घेण्यांत येवून  माझे नाव निवड यादीमध्ये नावे समाविष्ठ करण्यात यावी. अशी मागणी शेलार यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.