PMC Action Against Hotels | मोहम्मदवाडी, कर्वेनगर परिसरात महापालिका बांधकाम विभागाची हॉटेल वर कारवाई 

HomeपुणेBreaking News

PMC Action Against Hotels | मोहम्मदवाडी, कर्वेनगर परिसरात महापालिका बांधकाम विभागाची हॉटेल वर कारवाई 

गणेश मुळे May 28, 2024 3:18 PM

PMC Illegal Construction Action | कर्वे नगर परिसरातील रेणुका रेसिडेन्सीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई 
Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 
Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले

PMC Action Against Hotels | मोहम्मदवाडी, कर्वेनगर परिसरात महापालिका बांधकाम विभागाची हॉटेलवर कारवाई

 

PMC Building Devlopment Department – (The Karbhari News Service) – हडपसर येथील मोहम्मदवाडी परिसरातील अनाधिकृत बी बी सी रूफ टॅाप  Hotel च्या बांधकामवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कारवाई केली. तसेच कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात देखील कारवाई करण्यात आली.

पुणे महापालिकेकडून एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधित sr no 37,27 मोहम्मद वाडी हडपसर येथे नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावली असता कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने आज सदरचे बांधकामांचे क्षेत्रफळ 4000चौरस फुट हॉटेल व पत्रा शेड एकूण 7600 चौ फुट अनाधिकृत बाधकाम पाडण्यात आले. सदर चे बाधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून २ब्रेकर, 2 जेसीबी,3 ग्रॅस कटर,८बिगारी , पोलिस वर्ग,समवेत कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर कार्यकारी अभियंता श्री प्रविण शेंडे, उप अभियंता  हनुमान खलाटे,
शाखा अभियंता श्री संदीप धोत्रे , सागर सकपाळ, ऋतुजा चीलकेवार
यांच्या उपस्थितीमध्ये हि कारवाई करण्यात आली. तसेच या हॉटेलच्या बांदकामावर या पुर्वी देखील दोन वेळा करवाई करण्यात आली होती. व एमआरटीपी कलम 52 आनव्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोथरूड, कर्वे नगर येथे  हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई मधे सुमारे ५२०० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे. – हॉटेल गणराज,हॉटेल नेशन ५२,कॅफे २९ कॉर्नर, हॉटेल नैवेद्य,अनधिकृत आर सी सी बांधकाम बांधकाम पाडण्यात आले.

कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता – राजेश बनकर बांधकाम विभाग झोन क्र.६ चे कार्यकारी अभियंता  बिपीन शिंदे  यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता . श्रीकांत गायकवाड शाखा अभियंता-मुकेश पवार,राहुल रसाळे कनिष्ठ अभियंता – मनोजकुमार मते,सागर शिंदे, समीर गडाई व सहाय्यक गणेश ठोंबरे,श्री राठोड,हृषीकेश जगदाळे,भावेश इत्यादी स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने दोन जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.