PMC Employees Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना! | आतापर्यंत २३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा

Homeadministrative

PMC Employees Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना! | आतापर्यंत २३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा

Ganesh Kumar Mule Dec 12, 2025 7:05 PM

Pune News | Road Devlopment | चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस 
PMC Employees Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची पदोन्नती प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी
Pandharpur Aashadhi wari palkhi sohala | सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये

PMC Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना! | आतापर्यंत २३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा

 

PMC Accident Insurance | (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC GroupAccident Insurance Scheme) चालवली जाते. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात.  तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो.  त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा महापालिका कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका विमा संरक्षण देत आहे.  महापालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे १५  लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे.  त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ 265 रुपये दरमहा द्यावे लागतात.  महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे २३  कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने २ कोटी २४  लाख ६० हजार रुपये दिले आहेत. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Chief Labour Officer Nitin Kenjale PMC) यांनी दिली. (PMC Accident Insurance)

 

 

 – सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना

 

 महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.  यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात.  आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता.  परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे.  कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात.  यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत.  अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे.  अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना १० लाखांचा विमा मिळत होता. तो आता १५ लाख केला आहे.  जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो.  कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे.  पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.  यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ २६५ रुपये द्यावे लागतात. (Pune Municipal Corporation News)

दरम्यान अग्रिशमन विभागाकडील फायरमन सेवक कै. प्रताप सयाजी फणसे यांचा २१/७/२०२४ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. तसेच आरोग्य विभागाकडील बिगारी सेवक कै. समीर शिवाजी जाधव यांचा २०/८/२०२४ रोजी अपघाती मृत्यू झाला होता.

शुक्रवार  रोजी  पवनीत कौर (अतिरिक्त महापालिका आयुक्त – जनरल) यांचे हस्ते सदर सेवकांच्या वारस पत्नी  विद्या प्रताप फणसे व  रेखा समीर जाधव यांना प्रत्येकी रक्कम रुपये १५ लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे खाते प्रमुख  नितीन केंजळे (मुख्य कामगार अधिकारी), मंगेश जाधव (लिपीक टंकलेखक) हे उपस्थित होते. याबाबत संबंधित सेवकांच्या वारसांनी या आर्थिक मदतीबद्दल पुणे महानगरपालिकेचे आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0