PM Internship Scheme | पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला 15 एप्रिल पर्यंत मुदत वाढ! | उपायुक्त नितीन उदास यांची माहिती
PMC SDD – (The Karbhari News Service) – शहरातील व जिल्हयातील बेरोजगार तरुणांना विविध प्रकारचे कौशल्य देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला आता 15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 अशी होती.अशी माहिती समाज विकास विभागचे उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी दिली. (PMC Social Devlopment Department)
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेत एकूण 18 प्रकारच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येते त्यासाठी 500 कंपन्या सोबत करार करण्यात आला असून प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला वर्षभरात 66 हजार रुपये पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. या प्रशिक्षण सुरू असलेल्या कंपनीकडून 500 रुपये तर 4500 केंद्र सरकारचे असे एकूण महिन्याला पाच हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच आकस्मित निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातील तसेच पंतप्रधान जीवन ज्योती योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना देखील लागू होणार आहे. उमेदवारांचे वय 21 ते 24 असावे.
तसेच दहावी बारावी पदवी आणि डिप्लोमा व आय. टी. आय. किंवा बी.ए., बी.कॉम. तत्सम शिक्षण उत्तीर्ण बेरोजगार असलेल्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/login या वेबसाईटवर अर्ज करावा, अन्यथा पुणे महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयात समाज विकास विभागातील समूह संघटिका यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.
COMMENTS