Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड 

HomeपुणेBreaking News

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड 

कारभारी वृत्तसेवा Dec 06, 2023 3:50 PM

7th Pay Commission | ७ व्या वेतन आयोगापोटी पहिल्या हफ्त्याची रक्कम लवकरच मिळणार!
PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!
PMC Pune City AIDS Control Society | तुम्हांला Income Tax मधून सूट मिळवायचीय? तर मग पुणे महापालिकेच्या या संस्थेला डोनेशन द्या! | महापालिकेला मिळाले प्रमाणपत्र 

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड

Plastic Use Ban | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्रात प्लास्टिक वापराबाबत नियमांच्या तरतुदी लागू आहेत. त्यास अधीन राहून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने करण्यात आले आहे. अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे. (PMC Pune News)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २१६ च्या नियम ४ (२) नुसार (सुधारित केल्यानुसार ), “पॉलीस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह खालील एकल वापराच्या प्लास्टिक (SUP) चेउत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर दिनांक १ जुलै २०२२ पासून प्रभावीपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)

अ) प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणा-या प्लास्टिकच्या  काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन;
ब) प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, पेंढा, ट्रे, मिठाईचे बॉक्सेस, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर इ. (PMC Solid Waste Management Department)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या नियम ४(१) (क) नुसार (सुधारणा केल्यानुसार ) “व्हर्जिन किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकची कॅरी बॅग दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून पंचाहत्तर (७५) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून एकशे वीस (१२०) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार, संपूर्ण राज्यात हँडलसह आणि हँडलशिवाय प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या सर्व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्था/ कंपन्यांना खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

प्लास्टिकचे उत्पादन, वितरण, साठवण, विक्री किंवा प्लास्टिक वस्तू किंवा थर्माकोलचा वापर केल्यास किंवा पहिल्या वेळी ५०००/- दंड/तडजोड शुल्क, दुस-या वेळी १००००/-, तिस-या वेळी २५०००/- व तीन महिन्यांची कैद

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र वरील नियमांच्या तरतुदी आणि सुधारणांसह अधिसूचना लागू आहेत आणि सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने (मॉल्स/बाजारपेठे/शॉपिंग सेंटर/सिनेमा घर/पर्यटन ठिकाणे ) यांना सूचित करण्यासाठी जारी केले जात आहेत. शाळा/महाविद्यालये/कार्यालयीन ठिकाणे/रुग्णालये आणि इतर संस्था) आणि सामान्य जनतेने बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा,
विक्री, वाहतूक, वितरण किंवा वापर त्वरीत बंद करावा हे सर्व नागरिकांस आवाहन करण्यात आले आहे.