Plastic disposal machine | महापालिकेत बसवली प्लास्टिक डिस्पोजल मशीन! | प्लास्टिक बॉटल क्रश करून होऊ शकतो पुनर्वापर 

HomeपुणेBreaking News

Plastic disposal machine | महापालिकेत बसवली प्लास्टिक डिस्पोजल मशीन! | प्लास्टिक बॉटल क्रश करून होऊ शकतो पुनर्वापर 

Ganesh Kumar Mule Apr 26, 2023 2:18 PM

Single Use Plastic | प्लास्टिक बाबत कठोर कारवाई न करता आधी जनजागृती करा  | व्यापारी संघटनांची महापालिकेला सूचना 
Ajit Deshmukh : PMC : मिळकतकर विभागाची जबाबदारी उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे!  : महापालिका आयुक्तांचे आदेश 
PMC Deputy Commissioner Transfer | पुणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या बदल्या! | राज्य सरकारकडून आदेश जारी

महापालिकेत बसवली प्लास्टिक डिस्पोजल मशीन!

| प्लास्टिक बॉटल क्रश करून होऊ शकतो पुनर्वापर

पुणे | महापालिकेच्या (PMC Pune new building)नवीन इमारतीत प्लास्टिक डिस्पोजल मशीन (Plastic disposal machine) बसवण्यात आली आहे. या मशीनचा वापर करून प्लास्टिक बॉटल्स क्रश (plastic bottles crushing) करून त्याचा पुर्नवापर व पुर्नचक्रिकरणासाठी उपयोग केला जाणार असून त्यामुळे पर्यावरण संवर्धनास नक्कीच मदत होईल. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत (Deputy commissioner Asha Raut) यांनी दिली.

झेन्सार- आर. पी. जी. फाउंडेशन तर्फे प्लास्टिक डिस्पोजल मशीन पुणे महानगरपालिकेस सुपूर्त करण्यात आले. आर. पी. जी. फाउंडेशन हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५० अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आहे. यामध्ये सियाट लिमिटेड, झेन्सार टेक्नोलॉजीज लिमिटेड, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड रेकम आर. पी. जी. प्रायव्हेट लिमिटेड, आर. पी. जी. लाईफ सायन्सेस लिमिटेड, स्पेन्सर्स आणि कंपनी लिमिटेड, अशा विविध संस्थांचा समावेश आहे. (pmc pune)

हे  मशीन पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारत येथील तळ मजल्यावर बसविण्यात आले असून मनपा कर्मचारी, इतर नागरिक यांना याचा वापर करता येणार आहे. या मशीनचे उद्घाटन दिनांक २६/०४ रोजी आशा  राऊत, मा.उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रसाद जगताप, कार्यकारी अभियंता, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, व इतर अधिकारी उपस्थित होते. (plastic disposal machine in pmc pune)