Plastic Bottles | प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धा   |  7 टन 68  किलो प्लास्टिक बॉटल जमा  | सरासरी प्रति व्यक्ती 5.02 किलो बॉटल संकलन

HomeपुणेBreaking News

Plastic Bottles | प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धा | 7 टन 68 किलो प्लास्टिक बॉटल जमा | सरासरी प्रति व्यक्ती 5.02 किलो बॉटल संकलन

Ganesh Kumar Mule Mar 15, 2023 4:04 PM

PMC Toilet Seva App | पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळवा आता मोबाईल एप वर! 
Charge | PMC Pune | समाज विकास आणि समाज कल्याण विभागाची जबाबदारी आशा राऊत यांच्याकडे
Anti-Spitting Action | सार्वजनिक स्वच्छतेसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई पथकाची स्थापना 

प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धा |  7 टन 68  किलो प्लास्टिक बॉटल जमा 

| सरासरी प्रति व्यक्ती 5.02 किलो बॉटल संकलन 

पुणे – महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 7 टन 68 किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय आहे. अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. स्पर्धेला  मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली होती.

शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लास्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एक फेब्रुवारी रोजी ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची घोषणा केली होती. कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रिक बाइक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. ही स्पर्धा २८ फेब्रुवारीपर्यंत होती, मात्र नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली होती.

दरम्यान महापालिका  अधिकृत केलेल्या रिसायक्‍लर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्‍स, इंटरलॉकिंग ब्लॉक्‍स इ. साहित्य बनवून त्याचा वापर शहर सौंदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथच्या सुशोभीकरणासाठी करणार येणार आहे.
आशा राऊत यांच्या माहितीनुसार व्यक्तिगत स्तरावर 1153 लोकांनी सहभाग घेतला. शैक्षणिक स्तरावर 91, सोसायटी स्तरावर 147 अशा एकूण 1391 जणांनी सहभाग घेतला. व्यक्तिगत स्तरावर 4 हजार 489 किलो, शैक्षणिक स्तरावर 1 हजार 808 किलो तर सोसायटी स्तरावर 1 हजार 379 किलो बॉटल अशा एकूण 7 टन 68 किलो बॉटल जमा झाल्या. म्हणजेच प्रति व्यक्ती 5.02 किलो बॉटल संकलन करण्यात आले. राऊत यांनी सांगितले कि, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात 792 किलो, हडपसर ला 759 किलो तर कोथरूड बावधन ला 565 किलो बॉटल जमा झाल्या.