गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन
गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट
पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही पुणे महानगर परीवहन महामंडळाकडून दि. ३१/०८/२०२२ ते दि. ०९/०९/२०२२ या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये दि. ०१/०९/२०२२ ते दि. ०२/०९/२०२२ व दि. ०८/०९/२०२२ रोजी १६८ बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजे नुसार दि. ०३/०९/२०२२ ते ०७/०९/२०२२ व दि. ०९/०९/२०२२ या काळात गणेशोत्सवाकरीता जादा ६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास
बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री १० वा. नंतर बंद राहणार असून रात्री १० वा. नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
रात्रौ १०.०० नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये ५/- जादा दर आकारणी करण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्रौ
१२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.
श्री गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालु ठेवण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळकरोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.