पी.डी.इ.ए इंग्रजी माध्यम प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पुणे : जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विद्यालय, खराडी येथे जागतिक महिला दिन मुख्याध्यापिका अरुणा गुंळुंजकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला शिक्षिकांसाठी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
“तुझ्या उत्तुंग भरारीपुढे, गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली, विश्व सारे वसावे.”
कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेऊन संसाराचा गाडा यशस्वीरीत्या पुढे चालवण्याची ताकद एका स्त्रीमध्ये असते. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या सन्मानार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च १९०८ साली अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी केलेल्या इतिहास कामगिरीच्या स्मरणार्थ क्लारा झेटगी या कार्यकर्तीने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
तेंव्हापासून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सर्व स्त्रिया हा दिवस सन्मानाचा व अभिमानाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा करतात. या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा, समाजात मोलाचे काम करणाऱ्या स्त्रियांचा सत्कार केला जातो. महिला गटातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व महिला हा दिवस हक्काचा दिवस म्हणून आनंदाने साजरा करतात.
विजय कोद्रे सर (आंतरराष्ट्रीय तायकांदो प्रशिक्षक)यांनी विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन कोतवाल सर, कुंजबिहारी सर उपस्थित होते.
COMMENTS