Rupali Patil : पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय!   : रुपाली पाटील यांचे सूचक ट्विट 

HomeBreaking Newsपुणे

Rupali Patil : पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय!  : रुपाली पाटील यांचे सूचक ट्विट 

Ganesh Kumar Mule Dec 16, 2021 7:22 AM

NCP | Pune | पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन
OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?
OBC Reservation : NCP : खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय!

: रुपाली पाटील यांचे सूचक ट्विट

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare ) या अखेर महाविकास आघाडीत स्थिरावणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. खुद्द रुपाली पाटील यांनीच ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. रुपाली पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक शक्यता आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर सर्व चर्चांना रुपाली पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

रुपाली पाटील यांनी याबाबतच एक सूचक ट्विट केलं आहे. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…”, असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे. ट्विटमध्ये पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील टॅग केलं आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0