ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुन ते १० जुलै २०२२ या कालावधीमध्ये पुणे ते पंढरपूर या दरम्यान विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय वारीचे आयोजन करण्यात आले.
स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी व कोरोना मुक्त वारी तसेच वृक्षदिंडी चे आयोजन वारी मार्गावर करण्यात आले होते. सदर वारीच्या निमित्ताने वारी मार्गावर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या थीमवर अधारीत पथनाट्याचे पालखी मार्गावर १८ ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले. सदर वारीमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील हरीश चौधरी, हर्षल जाधव, सचिन दिवेकर व मनोज गायकर या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती चे काम केले.
वारीमध्ये सहभागी झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ अभय खंडागळे यांनी सर्व स्वयंसेवकांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व कौतुक केले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एम शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ डी एम टिळेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे उपस्थित होते.