क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी लेखन पॅड आणि कंपास साहित्य भेट दिले. तसेच परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. दहावी, बारावी झाल्यानंतर आता मागे पाहायचे नाही. नंतरच्या शिक्षणात तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर सांगा आपण ती नक्की सोडवू. शिकून आपल्याला चांगले काम करायचे आहे. ही जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा.” यावेळी तुषार पाटील, क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळेच्या मुख्याध्यापिका संकपाळ मॅडम, सतीश साठे, सीमा खेडेकर, विक्रम खेनट यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थिती होते.