Palkhi Sohala 2025 | पुणे महापालिकेकडून दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत
Pune Municipal Corporation – PMC – (The Karbhari News Service) – आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) एम. जे.प्रदीप चंद्रेन त्याचबरोबर उपायुक्त परिमंडळ क्र.१ माधव जगताप, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम , मुख्य अभियंता (प्रकल्प) युवराज देशमुख आदींनी स्वागत केले. (Pune Palkhi Sohala)
तसेच संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी केले.
यावेळी उपायुक्त परिमंडळ क्र.२ अरविंद माळी, महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर आदींनी स्वागत केले. यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी सारथ्य केले. सर्व दिंड्यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने जयत तयारी केलेली होती यामध्ये पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, त्याचबरोबर पालखी मार्गावरील स्वच्छता,आरोग्य सेवा इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती.


COMMENTS