Amol Balwadkar Pune | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी

अमोल बालवडकर यांना राखी बांधताना महिला.

HomeBreaking News

Amol Balwadkar Pune | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी

Ganesh Kumar Mule Aug 19, 2024 1:01 PM

Amol Balwadkar | अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”ला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद
Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद!
Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशनच्या ‘मंगळागौर’ आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

Amol Balwadkar Pune | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी

– अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

– आठ हजार भगिनींची उपस्थिती

 

Amol Balwadkar Foundation- (The Karbhari News Service) – भावा- बहिणीचे अतुट नाते जपण्यासाठी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रती महिला वर्गात आपला हक्काचा भाऊ म्हणून आगळे वेगळे नाते असून ते जपण्यासाठी महिलांचा उत्साह वाखाणण्यजोगा होता. सामुहिक पातळीवर हा भावा बहिणीच्या प्रेमाचा उत्सव कोथरूडकरांच्या चर्चेत विषय ठरला. (Amol Balwadkar Kothrud Vidhansabha)

 

अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे आयोजित रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी (दि.18) बालेवाडी येथील संजय फार्म, दसरा चौकात पार पडला. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी अनेक विधायक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रक्षाबंधन कार्यक्रम त्यापैकीच एक असून रविवारी आयोजित या कार्यक्रमाला आठ हजारहून अधिक महिलांची उपस्थिती होती. या महिलांनी अमोल बालवडकर यांचे औक्षण केले. त्यांच्या हातावर राखी बांधली. अमोल बालवडकर यांनीही प्रत्येक भगिनीची मायेने विचारपूस केली. त्यांच्या पाठीशी हा भाऊ खंबीरपणे उभा आहे असे सांगत या महिलांना आश्वस्त केले.

 

अमोल बालवडकर यांच्याकडून दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी आवर्जून भेटवस्तू दिली जाते. ही भेट वस्तू म्हणजे समस्त बहिणींचे रक्षण करण्याचा विश्वास त्यांना देऊन सदैव भाऊ म्हणून त्यांच्या पाठिशी राहण्याचा संकल्प असतो. तर बहिणींकडून भावाचे रक्षण सदैव राखीच्या धाग्याच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वासाचा धागा हातावर गुंफला जातो.

………………………………

भारतीय संस्कृतीमध्ये सण, समारंभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, समारंभांच्या माध्यमातून नाती, कुटुंबाविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आपण व्यक्त करतो. श्रावण महिन्यात येणारे सण हीच नाती दृढ करणारे असतात. त्यातून समाजात चैतन्य येते. आनंदाची देवाणघेवाण करणाऱ्या या संस्कृतीचे पाईक होण्याचा माझ्याकडून नेहमीच प्रयत्न असणार आहे.

अमोल बालवडकर, माजी नगरसेवक तथा संस्थापक अमोल बालवडकर फाउंडेशन

……………………….

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0