Millet Festival | कृषी पणन मंडळाच्यावतीने ८ ते १२ जानेवारीदरम्यान तृणधान्य महोत्सवाचे आयोजन

Homeadministrative

Millet Festival | कृषी पणन मंडळाच्यावतीने ८ ते १२ जानेवारीदरम्यान तृणधान्य महोत्सवाचे आयोजन

Ganesh Kumar Mule Jan 06, 2025 10:13 PM

Monsoon Session | विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार
PMC Road Department | पथ विभागाकडे रुजू झालेल्या नवीन अभियंत्यांना रस्ता आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण | पथ विभागाचा उपक्रम
Health Camp | ६ ऑगस्ट रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” | सोमेश्वर फॉऊंडेशन चा उपक्रम 

Millet Festival | कृषी पणन मंडळाच्यावतीने ८ ते १२ जानेवारीदरम्यान तृणधान्य महोत्सवाचे आयोजन

 

Maharashtra Krishi Panan Mandal – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने ‘मिलेट (तृणधान्य) महोत्सव-२०२५’चे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे ८ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे. या महोत्सवासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Raval) उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. (Pune News)

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे केल्यानुसार देशभर विविध उपक्रम राबविण्यात आले होते. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे सामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. तृणधान्य वर्षाची सांगता झालेली असली तरी, उत्पादक तसेच ग्राहकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. या दृष्टीकोनासह पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा उद्देशही या महोत्सवामागे आहे.

यामध्ये मिलेट व मिलेटची उत्पादने, त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था, नवोपक्रम (स्टार्टअप्स) यांच्याशी पणन मंत्री श्री. रावल थेट संवाद साधणार आहेत.

महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप सहभागी होणार आहेत. या ठिकाणी उत्पादकांना सुमारे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा आदी तृणधान्ये व त्यापासून तयार करण्यात येणारी उत्पादने तसेच ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली मिक्स, रागीचा डोसा मिक्स, ज्वारीचे आईसक्रीम आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असतील.

याबरोबरच मिलेट उत्पादन, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्वाबाबत नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन, खरेदीदार-विक्रेते संमेलन, मिलेटपासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांची प्रात्यक्षिके असतील. याशिवाय नागपूरचे संत्रा उत्पादकही यात सहभागी होणार आहेत. पुण्यातील ग्राहकांनी मिलेट खरेदी, विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याबरोबरच नववर्षाची सुरूवात आरोग्यपूर्ण अशा मिलेटने करावी, असे आवाहनही श्री. कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.