तुळशी बागेतील फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले
:19 मे पासून तुळशी बाग बंद
पुणे : तुळशी बागेतील व्यावसायिकांनी भाडे न भरल्याच्या विरोधात महापालिका प्रशासनाने इथली दुकाने 19 मे पासून बंद केली आहेत. 2018 पासून या व्यावसायिकांनी थकबाकी भरलेली नाही. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे कि फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरलेले आहे . अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्यातील तुळशीबाग ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्य भरातून लोक इथे खरेदी करण्यासाठी येतात. इथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना महापालिका प्रशासनाने शुल्क ठरवून दिले आहे. इथले व्यावसायिक अ+ गटात मोडतात. इथे एकूण 221 व्यावसायिक आहेत. 2018 सालापासून या व्यावसायिकांनी हे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तुळशी बाग बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता काही व्यावसायिकांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले आहे. तर 123 लोकांनी 15-20 हजार रुपये भाडे महापालिकडे जमा केले आहे. महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि सगळ्या व्यावसायिकांनी भाडे भरल्याशिवाय तुळशीबाग चालू केली जाणार नाही.
COMMENTS