Omprakash Divate IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती
| राज्य सरकारकडून आदेश जारी
PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे (Omprakash Divate IAS) यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या वतीने या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांपासून (PMC Officers) पुन्हा एकदा हे पद दूर जाताना दिसत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी संवर्गातील ओमप्रकाश दिवटे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्रति नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी किंवा महापालिका अधिकाऱ्या मधून पदोन्नती ने हे पद उपलब्ध होईपर्यंत असणार आहे. असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान महापालिका अधिकाऱ्याच्या हातून पुन्हा हे पद निसटले आहे. तीन अतिरिक्त आयुक्तांच्या पदांपैकी एक पद महापालिका अधिकाऱ्या साठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र पदोन्नती ने अजून महापालिकेचा अधिकारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे पद रिक्त होते. मात्र आता सरकारने हे पद प्रति नियुक्तीने भरले आहे.
COMMENTS