Odisha Train Accident | ओडिशा रेल्वे अपघात | पुणे शहर कॉंग्रेस कडून श्रद्धांजली आणि शोकसभा

HomeBreaking Newsपुणे

Odisha Train Accident | ओडिशा रेल्वे अपघात | पुणे शहर कॉंग्रेस कडून श्रद्धांजली आणि शोकसभा

Ganesh Kumar Mule Jun 05, 2023 4:22 PM

Pune | Modi Government | Congress | मोदी सरकारची आठ वर्षे | पुण्याच्या पदरी शून्यच
PM Modi Attack on congress : काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे
Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप

Odisha Train Accident | ओडिशा रेल्वे अपघात |पुणे शहर कॉंग्रेस कडून श्रद्धांजली आणि शोकसभा

Odisha Train Accident |  तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे कोरोमंडल एक्स्प्रेस, माल गाडी, आणि हावडा एक्स्प्रेस ह्या तिन्ही गाड्यांचा भयानक मोठा अपघात झाला. ह्या महाभयंकर अपघातामध्ये सरकारी आकडेवारी नुसार 288 प्रवासी मृत्यु पावले.  ह्या अपघातामध्ये जे प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्या साठी पुणे शहर काँग्रेस (Pune City Congress) ने  श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या श्रद्धांजली सभेत पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक माजी मंत्री उपस्थित होते. ह्यावेळी श्रद्धांजली सभे मध्ये सर्व नेत्यांनी थोडक्या शब्दां मध्ये श्रद्धांजली वाहिली, या श्रद्धांजली सभेचे नियोजन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,नगरसेवक अभिजीत शिवरकर, कॅन्टोन्मेंट चे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी केले होते. (Odisha Train Accident)

या शोकसभेसाठी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री रमेश दादा बागवे. मा प्रदेश महासचिव अभयजी छाजेड, मा कमलताई व्यवहारे ,मा ,संगीता तिवारी मा अजित दरेकर ,मा, रफिक शेख माननीय सुजाता शेट्टी, मा नानी राजगुरू , मा रजनी त्रिभुवन, मा नीता परदेसी, मा साहिल केदारी मा मुक्तार शेख ,मा,अविनाश बागवे मा प्रशांत सुरसे, मा सीमा महाडिक ,मा, सीमा सावंत यासेच पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune congress)

यावेळी पुणे शहर कांग्रेस चे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या श्रद्धांजलि पर भाषणात हा अपघात आहे की हत्या आहे. ह्या सरकारने हे बळी घेतले आहेत. तसेच रेल्वेचे बजेट कसे कमी केले ह्या सरकारने ,सिग्नल फेल्युअर रिपोर्ट आल्यावर ही गप्प बसले. निष्क्रियता दाखवली केंद्र सरकारने कॅग रिपोर्ट वर .रेल्वे मध्ये हजारोंची राहिलेली भरती सरकारने अजून केले नाहीये ,रेल्वे ट्रॅक रिपेअर केलेले नाहीयेत. रेल्वे मेंटेनन्स अजिबात नाहीये या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्या .
यानंतर एक तिरंगा मेणबत्ती लावून सर्वांनी मेणबत्ती पेटवून अपघातातील मृत प्रवासी व्यक्तींना  श्रद्धांजली अर्पण केली. आणि तसेच जे जखमी आहेत त्यांना देव लवकर बरे करो अशी प्रार्थना केली. (Odisha Train accident news)


News Title | Odisha Train Accident | Tribute and condolence meeting from Odisha train accident | Pune City Congress