प्रभाग रचनेवरील हरकती वाढल्या
: जास्तीत जास्त हरकती देण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील
पुणे : महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी(PMC election 2022) जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना(Objections-suggestions) नोंदविण्यासाठी शेवटचे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे हरकतींची संख्या वाढताना दिसते आहे. दरम्यान नागारिकांना येत्या सोमवारी ( दि.14) दुपारी 03:00 पर्यंत हरकती नोंदविता येणार असून रविवारी (दि.13) महापालिकेस सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज बंद असणार आहे. दरम्यान, गुरूवार सायंकाळपर्यंत 10 दिवसांत प्रभाग रचनेवर सुमारे 429 हरकती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षाने जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याबाबत नागरिकांना आवाहन(Appeal to citizens) केले आहे.
महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार दि.1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली आहे. त्यावर हरकती घेण्यासाठी दि. 14 फेब्रुवारीला दुपारी 03:00 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर, नागरिकांना या हरकती क्षेत्रीय कार्यालयाकडे नोंदविता येणार आहेत.
: सर्व पक्षांकडून हरकती
प्रभाग रचनेबाबत गेल्या 10 दिवसांत सुमारे 429 हरकती दाखल करण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. त्यात, प्रामुख्याने प्रभागांची रचना करताना आयोगाकडून घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत तर काही हरकती या प्रभागांच्या नावावर घेण्यात आल्या आहेत. तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षाने जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.
COMMENTS