एन.एस.एस. हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ | प्रा.डॉ. वसंत गावडे
एन.एस.एस.हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ व व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची भावना दृढ होते. स्वावलंबनाचे धडे मिळतात. असे प्रतिपादन प्रा. डॉ. वसंत गावडे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ,राष्ट्रीय सेवा योजना आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे, प्रितम प्रकाश महाविद्यालय (कला व वाणिज्य) इंद्रायणीनगर ,भोसरी, पुणे३९. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, “युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास” या उपक्रमांतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ शुक्रवार दि.१६ डिसेंबर २०२२ ते गुरुवार दि.२२डिसेंबर २०२२ या कालावधीत मु.पो.कोहिनकरवाडी ता.खेड, जि.पुणे, येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न होत आहे. सदर शिबीरात दररोज प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१७ डिसें.२०२२रोजी प्रबोधनपर बौद्धिक व्याख्यानात “राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास”या विषयावर बोलताना प्रा.डॉ.वसंत गावडे म्हणाले,” “एन.एस.एस.हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ व व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची भावना दृढ होते. स्वावलंबनाचे धडे मिळतात. स्वच्छता अभियान,आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक एकता वाढीसाठी विद्यार्थी तयार होतात. तसेच संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्त्व, संभाषण कौशल्य, ग्राम जीवनाचा अनुभव, इत्यादी पैलू राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शिकायला मिळतात. व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते आत्मसात होऊन विकसित होतात . लोकशाही मूल्य जोपासली जाऊन प्रेमाची भावना, बंधुत्व व सांघिक भावना ,जोखीम घेण्याची क्षमता,मानसिक क्षमता व शारीरिक क्षमता वाढते. आदर्श व्यक्तिमत्व जवळून अनुभवण्याची संधी मिळते. अनुभव व कृतिशीलता वाढते.विविध प्रकारच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. या सर्वांमधून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. सहकार्य,स्वावलंबन काय असतो हे शिकायला मिळते. या सर्वांचा परिपाक म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांमध्ये तयार होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना ही संस्कार देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे असे मला वाटते”
सदर व्याख्यानासाठी शिबिरार्थी व ग्रामस्थ हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी