राष्ट्रीय मजदूर संघाची आता महिला आघाडी | महिला कर्मचाऱ्यांना दिलासा
राष्ट्रीय मजदुर संघ कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने लढत असतो पण लढाई लढत असताना महिलांना कामगार म्हणून काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सोडवायलाही विचार पीठ असल पाहिजे अस परखड मत कामगार नेते सुनील शिंदे यांनी मांडले.
निमित्त होते राष्ट्रीय मजदूर संघ व अभिव्यक्ती आयोजित राष्ट्रीय मजदुर संघ महिला आघाडीचं उद्घाटन समारंभ व महिला मेळाव्याचे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम काँग्रेस भवन इथे झाला.
आज महिला व पुरुष म्हणून आपण प्रश्नाकडे पाहत राहिलो तर प्रश्न सोडवण अवघड होत पण आपण जर माणूस म्हणून जर लढलो तर प्रश्न सुटणं शक्य होईल या उद्देशाने आपणं महिला आघाडी सुरू करत आहोत असं मत अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी यांनी मांडले. या आघाडी उद्घाटन दरम्यान साफसफाई, घरकाम, दवाखाना, सुरक्षारक्षक अशा विविध क्षेत्रातील महिलांनी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या व या आघाडीची गरज अधोरेखित केली. या अडचणी सोडविण्याचा निर्धार या मेळावा निमित्त करण्यात आला. बाई माझ्या काचच्या बरणीत, मैं अच्ची हू घबराऊ नको ही गाणी तसेच महिला कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणाही घेण्यात आल्या. मुलगी झाली हो हे ज्योती मापसकर यांचं नाटक अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी सादर केलं.
संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सचिव एस.के. पळसे यावेळी उपस्थित होते. मेळाव्याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्र संचालन शंकुतला भालेराव व मेघा काकडे यांनी केले.