PMC Helpline | आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास   | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा

HomeपुणेBreaking News

PMC Helpline | आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा

Ganesh Kumar Mule Feb 27, 2023 1:40 PM

shivsena Pune | भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही | डॉ. नीलम गोऱ्हे
Dr Siddharth Dhende |  परभणीतील शहीद भीम सैनिकाच्या मृत्यू प्रकरणी प्रभाग दोन मध्ये उत्स्फूर्त बंद | नागरिकांकडून नागपूर चाळ, समता नगर येथे स्वयंस्फूर्तीने पुकारला बंद
Pune PMC News | महापालिकेच्या या विभागातील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू!

आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास

| महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा

महापालिकेकडून  पुणे शहरातील पाणीपुरवठा विषयक तक्रारी करीता २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना बिनधास्तपणे पाण्याच्या तक्रारी करता येणार आहेत. 1 मार्च पासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पुणे शहरातील पाणीपुरवठा विभागा संबंधित म्हणजेच पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिनी फुटणे व इतर संबधित तक्रारी करण्यासाठी नागरीकांना 1 मार्च 2023 पासून २४ तास तक्रार प्रणाली चालू करण्यात येणार आहे. नागरीकांनी आपल्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी हेल्पलाईन क्रमांक 020-25501383 यावर कराव्यात. असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.