Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये | पुणे शहर शिवसेनेचा इशारा 

HomeBreaking Newsपुणे

Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये | पुणे शहर शिवसेनेचा इशारा 

गणेश मुळे Feb 09, 2024 9:42 AM

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार
Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान! 
journalist Nikhil Wagle | पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत 

Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये | पुणे शहर शिवसेनेचा इशारा

Nikhil Wagle Latest News | निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी भारतरत्न बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधाना संबंधी पुणे शहर शिवसेनेने (Pune Shivsena) आपली भूमिका विशद केली आहे. निखिल वागळे यांनी चौकट ओलांडू नये आणि आपल्या विधानाबाबत वागळेंनी माफी मागावी, अशी भूमिका शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire), सहसंपर्क प्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale Shivsena Pune) आणि युवासेना राज्यसचिव किरण साळी (Kiran Sali Yuvasena) यांनी घेतली आहे. (Nikhil Wagle News)
शहर शिवसेनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार आपल्या विधानातून विद्वेष पसरवणाऱ्या तसेच प्रत्येक हिंदू नेत्यावर गरळ ओकणाऱ्या तथाकथित पत्रकार निखिल वागळे यांना पुणे शहर शिवसेनेची शेवटची समज आहे. लोकशाहीची आब राखून विधाने करायला शिका, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबत केलेले आक्षेपार्ह विधान तात्काळ मागे घ्या. अन्यथा शिवसेना तुम्हाला पुणे शहरात फिरू देणार नाही. असा इशारा शिवसेनेने दिला आहे. निवेदनांत पुढे म्हटले आहे कि बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या विधाना नंतर ओढवलेल्या नामुष्कीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पुणे शहराने घेतलेल्या भूमिकेचे पुणे शहर शिवसेना पूर्णपणे समर्थन करीत असून निखिल वागळे याने तात्काळ या संबंधी माफी मागावी. अशी भूमिका शहर शिवसेनेनं मांडली आहे.