NCP Youth Pune | पुणे शहर युवक अध्यक्षपदी समीर चांदेरे यांची चर्चा

HomeBreaking Newsपुणे

NCP Youth Pune | पुणे शहर युवक अध्यक्षपदी समीर चांदेरे यांची चर्चा

Ganesh Kumar Mule Jul 07, 2023 4:33 PM

Maharashtra Budget : Ajit Pawar : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून राज्याला काय दिले? 
Palakhi Sohala 2024 | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Resident Doctors Strike | निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ! 

NCP Youth Pune | पुणे शहर युवक अध्यक्षपदी समीर चांदेरे यांची चर्चा

NCP Youth Pune |  पार्थ अजित पवार (Parth Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे समीर चांदेरे (Sameer Chandere) हे पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांचे चिरंजीव आहेत. त्यांची पुणे शहर युवक अध्यक्षपदासाठी (NCP Youth Pune President) चर्चा सुरु झाली आहे. (NCP Youth Pune)
    समीर चांदेरे यांना राजकिय वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला वडिलांच्या बरोबरीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत समीर यांनी कोरोनाच्या काळात संपूर्ण कुटुंब कोरोना बाधीत असताना त्या गोष्टीची परवा न करता नागरिकांच्या मदतीला धावून जात होते, कोरोनाच्या काळात गोर- गरीब नागरिकांना रेशन धान्य वाटप करणे असो वा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे असो असे अनेक संकटांना ते धावून येत होते. (Ajit Pawar NCP Pune)
   नागरिकांच्या अडचणी सोडविताना त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले दिसून येत होते अहोरात्र धडपड करणारा , अनेक समस्या सोडविण्यासाठी महापालिका असो वा पोलिस ठाण्यात जाऊन युवकांच्या तसेच नागरिकांच्या, समस्या सोडविणे असो , पिण्याच्या पाण्यासाठी ,रस्ते,विद्युत,वाहतूक कोंडी असो अश्या अनेक कारणास्तव त्यांनी रस्त्यावर उतरलेले देखील पाहण्यात आले. (NCP Ajit Pawar Camp)
       परंतु अश्या धडपड करणाऱ्या युवकाला मागील दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदी  काम करण्याची संधी दिली नाही याची खंत अनेक पुणे शहरातील युवक  कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच मा. नगरसेवक दीपक मानकर यांची शहर अध्यक्षपदी निवड केली. आता पुणे शहर युवक अध्यक्ष पदासाठी मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे चिरंजीव समीर बाबुराव चांदेरे यांच्या नावाची चर्चा चालू आहे.
——-
News Title | NCP Youth Pune |  Discussion of Sameer Chandere as Pune City Youth President