NCP – SP | प्रभाग रचना बाबत आक्षेप नोंदवण्याचे राष्ट्रवादीचे (SP) आवाहन | पक्ष निवडणूक आयोग व न्यायालयात देखील आक्षेप नोंदवणार
PMC Ward Structure – (The Karbhari News Service) – आपल्या भागात चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली असेल तर त्याबाबत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. (PMC Election 2025)
पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेत अनेक प्रभाग चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आले आहेत, काही ठिकाणी नैसर्गिक सीमारेषा ओलांडून दोन भाग एकाच प्रभागात जोडण्यात आले आहेत. अशा चुकीच्या प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक आयोग व न्यायालयात आक्षेप नोंदवणार आहे. प्रभाग रचना आक्षेपाची जबाबदारी पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या भागात अशा चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली असेल तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, पुणे येथे २५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान माहिती द्यावी. असे जगताप यांनी म्हटले आहे.

COMMENTS