NCP – Sharadchandra Pawar Pune | भयमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मैदानात | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

HomeपुणेBreaking News

NCP – Sharadchandra Pawar Pune | भयमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मैदानात | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

गणेश मुळे May 24, 2024 2:52 PM

Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप
Video | Pune Road Accident | पुणे शहरातील रस्ते होताय मृत्यूचे सापळे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन
BJP Vs NCP – Sharadchandra Pawar | महाराष्ट्राला दिलेला १०.५ लाख कोटी रुपये निधीचा लेखाजोखा मुरलीधर मोहोळ यांनी मांडावा  | शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा जोरदार प्रहार

NCP – Sharadchandra Pawar Pune | भयमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मैदानात | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

 

Pune Porsche Car Accident – (The Karbhari News Service) – पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलिस प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. याविरोधात पुणेकरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune) यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, नुकत्याच झालेल्या “हिट अँड रन” प्रकरणामुळे आणि हे प्रकरण हाताळत असताना झालेल्या अक्षम्य चुकांमुळे पुणे शहराची संपूर्ण देशात नाचक्की झाली आहे. कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, हिट अँड रन सिटी अशी ओळख असलेले आपले पुणे शहर आता ड्रगचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे.

यावेळी कोयता गँगची दहशत, शहरात नेहमीच घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, अमली पदार्थांचा सुळसुळाट, अनधिकृत पब आणि बारवर असलेला प्रशासनाचा वरदहस्त अशा अनेक बाबींचा तीव्र निषेध करण्यात आला.
“गृहमंत्री जागे व्हा, तिघाडी सरकार जागे व्हा” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करत पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, शेखर धावडे, नितिन रोकडे, नीता गलांडे, वंदना मोडक, सारिका पारेख, फहीम शेख, आसिफ़ शेख, रोहन पायगुड़े, मदन कोठुळे, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, पायल चव्हाण, तनया साळुंखे, निलेश वरे आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.