NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती
NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या मान्यतेने माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती सेलची जबाबदारीही ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्या नियुक्तीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले जात आहे.