NCP President Sharad Pawar | माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती | शरद पवार 

HomeBreaking NewsPolitical

NCP President Sharad Pawar | माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती | शरद पवार 

Ganesh Kumar Mule May 05, 2023 1:26 PM

Lahuji Salve Smarak | लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी | पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा 
Maharashtra Budget 2025-26 | अर्थसंकल्पात पुणेकरांसाठी भरीव निधीची तरतूद..!
Ajit Pawar in Pune Ganeshotsav | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेट

NCP President Sharad Pawar | लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात शरद पवार (Sharad pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर होताना दिसले. मात्र अजित पवारांना (Ajit Pawar) या निर्णयाची कल्पना होती. असे शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (NCP Chief Sharad pawar Marathi news) 

| काय म्हणाले शरद पवार?

– संघटनात्मक बदल करणार. जबाबदारीचे पद घेणार नाही

-पक्षात उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवाय

-पक्षासाठी आणखी जोमानं काम करणार

-अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली

-महाविकास आघाडीवर कसलाही परिणाम पडणार नाही

-सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, यात तथ्य नाही.

-राष्ट्रवादीचे नेते भाजपात जाऊ इच्छितात हे खोटे आहे.

-राहुल गांधी यांनीही माझ्याशी चर्चा केली. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र काम करणार

-माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती.

(Sharad pawar Marathi news)