NCP Youth | April Fool | “एप्रिल फुलचा दिवस म्हणजे  मोदी विकासाचा वाढदिवस”  | राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

HomeपुणेBreaking News

NCP Youth | April Fool | “एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस” | राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

Ganesh Kumar Mule Apr 01, 2023 8:51 AM

DBT | Maharashtra Navnirman Vidyarthi Sena | डीबीटी रकमेवरुन विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन
Shivapur toll plaza : पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या
Thackeray Group | Pune| निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाची निदर्शने

“एप्रिल फुलचा दिवस म्हणजे  मोदी विकासाचा वाढदिवस”

| राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास. अशी व्याख्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली आहे. म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच “एप्रिल फुल” या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

दरवर्षी देशात दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार, वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार, पेट्रोल – डिझेल दरवाढ कमी करणार, महागाई कमी करणार, प्रत्येक नागरीकाला पंधरा लाख रुपये देणार अशा अनेक खोट्या घोषणा मोदी यांनी निवडणूकीपूर्वी केल्या परंतु यातील एकही घोषणा त्यांनी पुर्ण केली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.


आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,अभिषेक बोके,मयूर गायकवाड उपस्थित होते.