Naval Kishore Ram IAS on PMC Election | भवानी पेठ व कसबा पेठ यांच्या मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS on PMC Election | भवानी पेठ व कसबा पेठ यांच्या मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

Ganesh Kumar Mule Jan 05, 2026 1:41 PM

MLA Sunil Tingare | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार | आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री सामंत यांचे आश्वासन
Maharashtra Day | राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांबाबत महापालिका आयुक्तांचे हे नवीन आदेश 
Dearness Allowance | केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 4% वाढणार!

 Naval Kishore Ram IAS on PMC Election | भवानी पेठ व कसबा पेठ यांच्या मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज सकाळी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC Election 2026)

या पाहणीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह उपायुक्त  प्रसाद काटकर,  अरविंद माळी, श्रीमती आशा राऊत, सहायक आयुक्त तिमय्या जागले,  महाडिक उपस्थित होते.

यावेळी मतदान यंत्रांची पाहणी, स्ट्रॉंग रूमची पाहणी, मतमोजणी केंद्राची पाहणी तसेच निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान यंत्रांची सुरक्षितता, स्ट्रॉंग रूममधील संरक्षक व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, अग्निशमन सुविधांची उपलब्धता तपासणी, तसेच मतमोजणी केंद्रातील आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी मतदान यंत्रांची पाहणी करून तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधला.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी विद्युत व्यवस्था सुरक्षित ठेवणे, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणे, तसेच मतमोजणीची प्रक्रिया नियोजित वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा व नियंत्रण कक्षांची योग्य व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व नियमानुसार पार पडावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भवानी पेठ व कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयामार्फत निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेत पुढील आवश्यक सुधारणा व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: