Naval Kishor Ram IAS | पालखी मार्गाची उर्वरीत कामे पुढील ३ दिवसांत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त यांचे आदेश  

Homeadministrative

Naval Kishor Ram IAS | पालखी मार्गाची उर्वरीत कामे पुढील ३ दिवसांत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त यांचे आदेश  

Ganesh Kumar Mule Jun 13, 2025 9:25 PM

Aashadhi Wari 2024 | Sharad Pawar | शरद पवारांसह मान्यवर चालणार एक दिवस वारीत!
Palakhi Sohala 2024 | ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून ‘निर्मलवारी’ पूर्वतयारीचा आढावा
Kasba Constituency | Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना | हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

Naval Kishor Ram IAS | पालखी मार्गाची उर्वरीत कामे पुढील ३ दिवसांत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त यांचे आदेश

 

Palakhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील पालखी मार्गाची पाहणी आज शुक्रवार रोजी  महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली. (Pune PMC News)

महापालिका आयुक्त यांनी खातेप्रमुख , पोलिस अधिकारी यांचे समवेत पालखी मार्गावर केलेल्या कामांचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांनुसार राडारोडा , कचरा उचलणे, खड्डे दुरूस्ती करणे, झाडाच्या फांद्या छाटणे, अतिक्रमण काढणे , सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे व लोंबकाळणाऱ्या वायर काढणे इत्यादी कामे विनाविलंब करण्यात यावीत असे आदेश दिले. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने विविध शासकीय, निमशासकीय संस्था, पोलिस विभाग यांचेशी समन्वय ठेवून कामकाज करण्यात यावे. पुढील ३ दिवसांत उर्वरीत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश  महापालिका आयुक्त यांनी संबंधित खातेप्रमुख यांना दिले. (Pune Municipal Corporation – PMC)

पालखी मार्ग पाहणीचे वेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) एम.जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि )  ओमप्रकाश दिवटे, मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, मुख्य अभियंता ( पथ )  अनिरूध्द पावसकर, उप आयुक्त ( घनकचरा व्यवस्थापन )  संदीप कदम , मुख्य अभियंता (मलनि:सारण )  जगदीश खानोरे इ. अधिकारी उपस्थित होते.