National Dengue Day 2024 Theme | राष्ट्रीय डेंगू दिन निमित्ताने पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून डेंगू बाबत जनजागृती
PMC Health Department – (The Karbhari News Service) – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार डेंग्यू विषयी जनजागृती होऊन जनतेचा सक्रीय सहभाग करून घेण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका आरोग्य कार्यालय किटक प्रतीबंधक विभागामार्फत १६ मे रोजी “ राष्ट्रीय डेंग्यू दिन ” (National Dengue Day) साजरा करण्यात आला. अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ सुर्यकांत देवकर (Dr Suryakant Deokar PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation Health Department)
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे यावर्षाचे घोषवाक्य – “ समुदायाच्या संपर्कात राहा, डेंग्यूला नियंत्रित करा. असे आहे.
डेंग्यूचा प्रसार करणारा एडीस इजिप्ती डासाची पैदास स्वच्छ पाण्यात होत असल्याने राष्ट्रीय डेंग्यू दिनांच्या निमिताने किटक प्रतिबंधक विभाग १५ क्षत्रीय कार्यालयामार्फत खालील प्रमाणे जनजागारण कार्यक्रम राबविण्यात आला :
– प्रभात फेरी / पदयात्रा तसेच बाईक रली काढण्यात आली.
– नागरिकांना माहितीपत्रके / हस्तपत्रके वाटप करून जनजागरण करण्यात आले.
– मजूर वसाहत, भाजी मार्केट, बस स्थानके तसेच विविध आस्थापना येथे स्टिकर्स लावून जनजागरण करण्यात आले.
– डेंग्यू डास / डास आळी (ब्रिडिंग), गप्पी मासे यांचे प्रदर्शन दाखविण्यात आले.
– खाजगी वैद्यकीय व्यासायिक यांना भेटून डेंग्यू प्रतीबंधक उपाय योजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरीकांना डेंग्यू आजाराविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागरण करण्यात आले.
– पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांच्या वतीने सर्व नागरीकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले.