National Commission for Safai Karmchari | क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करा, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करा | राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांच्या सूचना
PMC Sanitation Workers – (The Karbhari News Service) – क्षेत्रिय कार्यालय (PMC Ward Office) स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करा, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करा. अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे (National Commission for Safai Karmchari) अध्यक्ष एम व्यंकटेशन (M Vyankteshan) यांनी पुणे महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. (Rashtriya Safai Karmchari Ayog)
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन केंद्रीय राज्यमंत्री दर्जा यांचा पुणे शहर दौरा आयोजित करण्यात आला असून त्या अनुषंगाने दिनांक २४ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सर्व सफाई कर्मचारी यांचे मासिक वेतन, पेन्शन/ग्रॅज्युटी/पी.एफ., सफाई कर्मचा-यांना मंजूर असलेल्या सुट्ट्या, सफाई कर्मचा- यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना, सी. एस. आर. स्किम्स, वारसांबाबतचे विविध प्रश्न, सेवकांची आरोग्य तपासणी, वेतनाबाबतच्या समस्या, ग्रेड पे बाबतच्या समस्या, घराबाबतच्या
समस्या तसेच अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
समस्या तसेच अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अध्यक्ष यांनी सफाई कर्मचा-यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करावी, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करावा. तसेच ESI, PF भरला जात असलेबाबत खातरजमा करावी अशा सुचना अध्यक्ष यांनी दिल्या.
तसेच Manual Scavengers and Their Rehabilitation Act, 2013 बाबत देखील चर्चा होऊन पुणे महानगरपालीकेच्या परिक्षेत्रामध्ये मानवी मलमूत्र स्वच्छतेचे काम हाताने किंवा डोक्यावर नेण्याचे काम केले जात नसल्याचे सांगण्यात आले.
बैठकीसाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन, केंद्रीय राज्यमंत्री दर्जा, पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, डॉ. कल्पना बळीवंत, प्र. आरोग्य अधिकारी, नितीन केंजळे, कामगार कल्याण अधिकारी, उपायुक्त, परिमंडळ १ ते ५ व इतर विभागांचे खातेप्रमुख व अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इ. उपस्थित होते.