Nasha Mukt Bharat Abhiyan | ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन

HomeBreaking Newsपुणे

Nasha Mukt Bharat Abhiyan | ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jun 11, 2023 10:08 AM

Cycle tour | जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Bihar Political Crisis | नितीश कुमार यांचा राजीनामा | राजदसोबत सरकार स्थापन करणार
PMRDA receives Rs. 410 cr from Centra Government for the Pune Metro Line

Nasha Mukt Bharat Abhiyan | ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन

Nasha Mukt Bharat Abhiyan | केंद्र सरकारने (Centra Government) अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ (Drug Free India) हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 12 ते 26 जून 2023 या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” (Nasha Mukt Bharat Abhiyan) जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. (Nasha Mukt Bharat Abhiyan)

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

सचिव श्री.भांगे म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. 26 जून या जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे.

“नशा मुक्त भारत” चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही सचिव श्री.भांगे यांनी सांगितले.


News Title | Nasha Mukt Bharat Abhiyan | Government’s appeal to celebrate ‘Nash Mukt Bharat Fortnight’