Namdev Dhasal | सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन

HomeBreaking News

Namdev Dhasal | सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन

Ganesh Kumar Mule Mar 01, 2025 5:12 PM

Pune Metro Station Agitation | मेट्रो स्टेशनवर आंदोलन | पक्षाकडून हकालपट्टी
Pune News | पुणे शहरात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन
Vidhansabha Election 2024 | शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी | पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले

Namdev Dhasal | सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन

 

Censor Board – (The Karbhari News Service) – सेन्सॉर बोर्डाचा, मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी “नामदेव ढसाळ कोण?” या प्रश्नाचे सणसणीत उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. (NCP-SCP Pune)

सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राजसत्तेला आपल्या विद्रोही साहित्याने शुद्धीवर आणणारे महान कवी पद्मश्री नामदेवजी ढसाळ यांचे कार्य संपूर्ण जगाला सर्वश्रुत आहे. मात्र, भारतात चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ माहिती नसावेत हे आपल्या भारताचे दुर्दैव आहे. मोदी सरकारने कोणतीही बौद्धिक योग्यता नसताना आपल्या मर्जीतील निर्बुद्ध लोकांना अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये बसवल्यामुळे आपल्यावर ही वेळ ओढवली आहे. असे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

या आंदोलनास प्रशांत जगताप, माज़ी आमदार श्री. जयदेवराव गायकवाड़, पंडित कांबळे, किशोर कांबळे,स्वातिताई पोकळे, चंद्रशेखर धावड़े,गणेश नलावडे,पायल चव्हाण,नितिन रोकड़े, रोहन पायगुडे,कुशल मोरे,रूपाली शेलार,सानिया झुंझार,जावेद शेख,फहीम शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.