Muralidhar Mohol | युद्ध हे हवेतून विमान परत आणण्या इतपत सोपी गोष्ट नाही | मराठा सेवा संघाने मुरलीधर मोहोळ यांच्या पोस्ट चा घेतला समाचार
Pune News – (The Karbhari News Service) – भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पोस्ट वरून चांगलाच गदारोळ सुरु आहे. विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर मराठा सेवा संघाने देखील मोहोळ यांच्या पोस्ट चा समाचार घेतला आहे. युद्ध हे हवेतून विमान परत आणण्या इतपत सोपी गोष्ट नाही, अशी टीका संघाने केली आहे. (IND PAK War)
मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर यांनी म्हटले आहे कि, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व देश, सर्व राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. पाकिस्तान वर लष्करी कारवाई करण्याबाबत समर्थन सर्व देशाने व सर्व राजकीय पक्षाने केले आहे. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्याच प्रयत्नात मंत्री झालेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे या गोष्टीचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता युद्ध कोणालाच नको असते; परंतु आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचा अतिरेक्यांनी बळी घेतल्यानंतर अतिरेक्यांच्या जन्मभूमी असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवणे हे केंद्रात असलेल्या सरकारचे काम असते. पुण्याच्या खासदारांनी मिळालेल्या मंत्रीपदाचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी व प्रामाणिकपणे काम करण्यासाठी करावा. युद्ध म्हणजे हवेतून विमान परत आणणे इतकी सोपी गोष्ट नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. ते आता भारत सरकारचे मंत्री आहेत मोदी शहा आणि फडणवीस यांचे सांगकामे नाहीत याची जाणीव त्यांनी ठेवावी.
आज त्यांनी केलेल्या ट्विटचा पुणेकर म्हणून मी जाहीर निषेध करतो. असे सचिन आडेकर यांनी म्हटले आहे.
COMMENTS