PMC : Aviation gallery : महापालिकेचा एव्हिएशन गॅलरी प्रकल्प लवकरच नागरिकांसाठी खुला!    : 10 ते 25 रुपयांपर्यंत आकारले जाणार तिकीट

HomeपुणेPMC

PMC : Aviation gallery : महापालिकेचा एव्हिएशन गॅलरी प्रकल्प लवकरच नागरिकांसाठी खुला!  : 10 ते 25 रुपयांपर्यंत आकारले जाणार तिकीट

Ganesh Kumar Mule Oct 25, 2021 3:22 PM

Archana Patil : Lahuji Vastad Salve : पुणे महापालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र! : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या  बैठकीसह मुख्य सभेची मान्यता
Divisional Commissioner : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा  : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश 
Samajmandir, Gymnasium | PMC | समाजमंदिर, व्यायामशाळा विनियोग नियमावलीत बदल 

महापालिकेचा एव्हिएशन गॅलरी प्रकल्प लवकरच नागरिकांसाठी खुला!

: 10 ते 25 रुपयांपर्यंत आकारले जाणार तिकीट

: नागरिकांना, विमानाचे व विमान उदयोगाची माहिती होणार

पुणे: महापालिकेच्या वतीने शहरात एव्हिएशन गॅलरी प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना विमानाचे व विमान उदयोगाची माहिती होणार आहे. हा प्रकल्प लवकरच नागरिक आणि पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी महापालिकेने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मुख्य सभे समोर  ठेवला होता . त्याला मुख्य सभेने मंजुरी दिली आहे.

: पुणे शहरासाठी मोठे आकर्षण

पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्र.१४ च्या आवारातील दर्शनी भागातील बंद असलेल्या शाळेच्या चार मजली इमारतीमध्ये , “एव्हीएशन गॅलेरी “हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन भवन रचना विभागामार्फत केले होते. त्या अनुषंगाने म.न.पा.ची शाळा क्र.१४ मधील दर्शनी भागातील शाळेच्या इमारती मधील ग्राउंड फ्लोअर अधिक तीन मजले हा भाग “एव्हीएशन गॅलेरी “या प्रकल्पासाठी म.न.पा.च्या शिक्षण मंडळाने, भवन रचना विभागाला दिला होता. सदरील प्रकल्प वर्ग खोल्या ७१७.५८ चौ.मी.क्षेत्रफळावर साकारण्यात आलेला आहे. प्रकल्पाचा ताबा,मालमत्ता व व्यवस्थापन विभागामार्फत ०५ मार्च २०२० रोजी घेणेत आला आहे. तसेच या आगळया वेगळया प्रकल्पासाठी आवश्यक ते शुल्क आकारून सदर प्रकल्प विदयार्थ्यांना, नागरिकांना,पर्यटकांना खुला करण्याचे अनुषंगाने आवश्यक ती पुढील कार्यवाही सत्वर सुरू करणे आवश्यक आहे.   पुणे महानगरपालिकेच्या या आगळया वेगळया प्रकल्पाचे उद्घाटन 9 मार्च 2020 रोजी झाले. हा प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. विमानाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच एक कुतुहल असते,विमान तसेच वैमानिक उदयोगात असलेल्या रोजगाराचा विविध संधी याविषयी सर्वागिण व शास्त्रशुध्द माहिती देणारे कायम स्वरूपी प्रदर्शन यामुळे “एव्हीएशन गॅलेरी ‘युनिक आहे. या “एव्हीएशन गॅलेरी व्दारे विदयार्थ्यांना,पर्यटकांना,नागरिकांना, विमानाचे व विमान उदयोगाची माहिती होणार असुन पुणे शहरासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यानुसार ,“एव्हीएशन गॅलेरी” येथे तिकिट आकारणी करून  सर्वांसाठी खुले केले जाईल.

: असे असेल तिकीट

व्यक्ती.                                                           तिकिट
प्रौढ नागरिक.                                               २५/- प्रत्येकी
विदेशी नागरिक                                            ३००/- प्रत्येकी
दिव्यांग व्यक्ती                                            मोफत
४. विदयार्थी शैक्षणिक सहल शिक्षकांसह.
अ. खाजगी शाळामधील विदयार्थी.                  १०/- प्रत्येकी
ब. म.न.पा.शाळा ,जिल्हा परिषद व शासकीय
शाळांचे विदयार्थी                                        मोफत
लहान मुले १२ वर्षापर्यंत.                              १०/- प्रत्येकी

माझ्या  विकास निधीतून एव्हीएशन गॅलरी हा पुर्ण झाला आहे. हा प्रकल्प पुणेकर नागरिकांना लवकरत लवकर पाहता यावा यासाठी महापालिका प्रशासनाने लवकर निविदा प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प जनतेसाठी खुला करावा

       नगरसेविका प्रा.सौ.ज्योत्स्ना एकबोटे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0