शिष्यवृत्ती योजनांसाठी महापालिकेने अर्ज मागवले | 22 ऑगस्ट ते 31 डिसेंबर करू शकता अर्ज
पुणे | पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. 22 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता.
पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.
सदरचे अर्थसाहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. इ. १० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरणे आहे.
उपरोक्त योजनेचे अर्ज दि. २२ ऑगस्ट २०२२ ते दि. ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत. याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर बघण्यात यावे.
■ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना-*
■ अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना-*
*१. सन २०२२ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०% आणि ४०% दिव्यांगत्व लोकशाहीर असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.
२. शैक्षणिक अर्थसाहाय्य हे इ. १० / १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल