Mundhwa Chowk Widening | मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत! | PMC अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

HomeBreaking Newsपुणे

Mundhwa Chowk Widening | मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत! | PMC अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

गणेश मुळे Feb 10, 2024 7:05 AM

  Traffic in Mundhwa Chowk smooth!  | PMC Additional Commissioner Vikas Dhaknes Information
Pune Municipal Corporation | क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकतींची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही!
PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!

Mundhwa Chowk Widening | मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत! | PMC अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

Mundhwa Chowk Widening | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वाचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. मात्र भूसंपादन अभावी रस्ते विकसनात अडथळे येत होते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून समस्या बनून राहिलेले मोठे अडथळे प्रशासनाने दूर केले आहेत. त्यामुळे मुंढवा चौकातील (Mundhwa Chowk pune) काम करून वाहतूक  सुरळीत झाली आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली. दरम्यान या चौकातील समस्या सोडवण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) हे देखील सातत्याने पाठपुरावा करत होते. (Mundhwa Chowk Latest News)
the karbhari - mundhwa chowk news

मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत झाल्याचे दाखवताना महापालिका पथ विभागाचे अधिकारी

याबाबत अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले कि, खराडी ते हडपसर (Kharadi- Hadapsar Road) या रोडवरील महत्वाच्या मुंढवा चौकात वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. खूप तक्रारी वाढल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये मनपा प्रशासनाने कारवाई करून रस्ता मोकळा केला होता. परंतू श्री कोद्रे आणि इतर ४ अशा एकूण ५ मालमत्ता ताब्यात नव्हत्या. तसेच वर्षानुवर्षे त्या ताब्यात घेण्यास मोठा विरोध आणि कायदे विषयक अडथळे होते. मात्र महापालिकेच्या पथ विभाग, विधी विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाने एकत्रित काम करून या जागा ताब्यात घेतल्या. जागा मालकांना त्या बदल्यात टीडीआर देण्यात आला. त्यामुळे चौकात काम करणे सोपे झाले. परिसरात जे अतिक्रमण होते ते काढून टाकण्यात आले आणि रस्ता मोठा करण्यात आला. त्यामुळे आता मुंढवा चौकात वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा त्रास वाचला आहे.
दरम्यान मुंढवा चौकातील वाहतुकीची अडचण सोडवण्यासाठी प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला होता. परिसरात आंदोलने देखील करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकातील समस्या कामयस्वरूपी मिटवली आहे.