Mukhyamantri Majhi Ladki Bahin | चुकीच्या आमिषाला बळी न पडता लाडकी बहन योजनेचा लाभ घ्या : डॉ. सिद्धार्थ धेंडे

HomeBreaking Newsपुणे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | चुकीच्या आमिषाला बळी न पडता लाडकी बहन योजनेचा लाभ घ्या : डॉ. सिद्धार्थ धेंडे

गणेश मुळे Jul 05, 2024 3:56 PM

Dr. Siddharth Dhende: भारतातील पहिल्या धान्य वितरण करणाऱ्या मशीनचे लोकार्पण
Dr. Siddharth Dhende | पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’ | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी
PMC Ward No 2 | प्रभाग दोन मधील समस्यांच्या निराकरणासाठी निधी उपलब्ध करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | चुकीच्या आमिषाला बळी न पडता लाडकी बहन योजनेचा लाभ घ्या : डॉ. सिद्धार्थ धेंडे

| प्रभाग दोन मध्ये योजनेविषयी जनजागृती ; डॉक्टर धेंडे यांचा पुढाकार

| महापालिका समूह संघटिका, अंगणवाडी सेविका, महा ई सुविधा केंद्र संचालक यांनी केले मार्गदर्शन

 

Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – कोणालाही जास्तीचे पैसे न देता तसेच काही राजकीय लोकांच्या चुकीच्या आमिषाला बळी न पडता लाडकी बहन योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केले. योजनेची प्रक्रिया सोपी असून त्याबाबत कोणीही संभ्रमात राहू नये. प्रभागातील नागरिकांपर्यंत योजना पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन डॉ. धेंडे यांनी केले.

लाडकी बहन योजने संदर्भात अनेकांमध्ये संभ्रम आहे. अर्ज कसा भरायचा याची नागरिकांना माहिती नाही. याबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच योजनेची योग्य माहिती देण्यासाठी प्रभाग दोन मध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. धेंडे बोलत होते.

या वेळी महापालिका समूह संघटिका शीला गायकवाड, अंगणवाडी सेविका नीलिमा चांदेरे, जना गायकवाड, कोमल भगत, जोत्स्ना वाघ, माधुरी गायकवाड, पुष्पा तायडे आदींसह प्रभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या शिबिरात पुणे महापालिकेच्या समूह संघटिका, आरोग्य सेविका, या भागातील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेसाठी प्रभाग दोन मधील सर्व अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस दोन नागरी सुविधा केंद्र चालक हे मदत करतील. काही जण या योजनेची माहिती नसताना, योजनेचे स्वरूप पूर्ण माहीत नसताना नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांनी अधिकचे पैसे कोणालाही न देता या योजनेचा लाभ घ्यावा. काही अडचण असल्यास कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले.

अंगणवाडी सेविका नीलिमा चांदेरे म्हणाल्या की, आपण या चांगल्या योजनेचे लाभार्थी होणार आहोत. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येतात.

समूह संघटिका शीला गायकवाड म्हणाल्या की, पुणे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांना खासगी क्लाससाठी आर्थिक मदत मिळते. यासह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकलसाठी अनुदान. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाखांचे अनुदान आहे. यासह अपंग बांधव, महिला यांच्यासह अनेक योजना दिल्या जातात. त्याचाही लाभ घ्यावा.

 असा अर्ज भरा –

अंगणवाडी सेविका नीलिमा चांदेरे यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया उपस्थित महिलांना समजावली. यामध्ये नारी शक्ती ॲप डाऊनलोड करणे. ऑनलाईन लिंक ओपन करून योजनेचा अर्ज मोबाईलवर डाऊनलोड करणे. त्यावर प्रोफाईल क्रिएट करने. आपण कोण आहोत, उदा. एक सामान्य महिला, गृहिणी, बचत गटाच्या अध्यक्ष, अंगणवाडी सेविका या पैकी एक पर्याय निवडून क्लिक करायचा आणि प्रोफाइल अपडेट करायची. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर अर्ज आपोआप ओपन होतो. तो अर्ज भरायचा आहे. सुरुवातीला आपली माहिती, त्यानंतर बँकेची माहिती भरणे. त्यानंतर कागदपत्र अपलोड करणे. लाईव्ह फोटो अपलोड करणे. सर्वर व्यवस्थित चालू असल्यास पाच ते दहा मिनिटात अर्ज पूर्ण होतो. त्यानंतर हमिपत्राची प्रिंट काढून ओरिजनल हमीपत्र फोटो काढून साईट वर अपलोड केल्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण होते. एका घरात दोनच व्यक्ती अर्ज भरू शकतात. त्या मध्ये एक विवाहित एक अविवाहित यांचा समावेश आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत हे अर्ज भरण्याची मुदत आहे.

 : ही कागदपत्र आवश्यक –

आधार कार्ड, रहिवास किंवा आदिवास प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला. बँक पासबुक (आधार आणि मोबाईल नंबर लिंक असलेला). जिल्हाधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला, पिवळे, केशरी शिधापत्रिका, हमीपत्र.