Rashtriya Chhatra Sena | दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची निवड

HomeपुणेBreaking News

Rashtriya Chhatra Sena | दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची निवड

Ganesh Kumar Mule Jan 19, 2023 1:08 PM

President | MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण
National Clean Air Programme | पुणे शहराला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले
CM Mets PM | केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची निवड…

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्रातून ११६ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली आहे. त्यात पुणे ग्रुप मधून ३५ कॅडेटची निवड झाली असून त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनचे १३ कॅडेटची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपुर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यात कु.पाणिनी सुनील तिबिले ही बाबुरावजी घोलप महाविद्यालयाची व २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी ची छात्र आहे. तिने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक शिबीर असे दहा शिबिरे पूर्ण केले आहे. सदर कॅम्पमध्ये मेहनत, परिश्रम व नियमित सराव करून दिल्लीला पोहचली असून पुणे एनसीसी ग्रुप, २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे, बाबुरावजी घोलप महाविद्याय तसेच पुणे-पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचविले आहे.
राष्ट्रीय पथसंचलनासाठी निवड होणे महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी व्यक्त केले. कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणार्याप संचलनासाठी मला संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे, खूप सरावानंतर ही संधी मला मिळाली आहे, असे छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिने सांगितले.

एनसीसी युनिट महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६ मध्ये सुरू झाले असून अनेक छात्रांची सैन्यदलात व पोलीसदलात निवड झाली आहे. तसेच आतापर्यंत चार छात्रांची कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होत असलेल्या पथसंचलनासाठी निवड झालेली असून आमच्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे, अशी माहिती एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, २ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल फरहाद अहमद तसेच एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांच्याकडून छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिला प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.अजितदादा पवार साहेब, उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा.अ‍ॅड.संदीप कदम, खजिनदार मा.मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल.एम.पवार, सहसचिव मा.ए.एम.जाधव, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी निवड झालेल्या कॅडेटचे कौतुक करून दिल्लीच्या संचलनास सुभेच्छा दिल्या.