Rahul Gandhi Vs PM Narendra Modi : मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत : कोरोनामुळे पाच  नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू

HomeBreaking NewsPolitical

Rahul Gandhi Vs PM Narendra Modi : मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत : कोरोनामुळे पाच  नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू

Ganesh Kumar Mule Apr 17, 2022 4:06 PM

No Restrictions : राज्यात निर्बंधांत शिथीलता : ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश
Monkey Pox | घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….
Rapid Test | महापालिका अधिकारी/सेवकाना  रॅपिड कोरोना चाचणी अनिवार्य  | आरोग्य विभागाचे सर्व विभागांना आदेश 

मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत

: कोरोनामुळे पाच  नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू

: राहुल गांधी यांचा दावा

करोनाच्या संकटातून सध्या देश लढत पुढे जात आहे. पहिल्या लाटेपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपर्यंत करोनाने देशातील करोडो लोकांना वेठीस धरले. त्याचवेळी, सरकारी आकडेवारीनुसार, देशातील करोनामुळे मृतांचा आकडा पाच लाख २१ हजार ७५१ वर पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे आकडे खोटे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. करोनामुळे पाच लाख नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे करोना व्हायरसमुळे ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. ट्विटरवर, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखत

“मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला नाही! मी याआधीही म्हटले होते कोविडमध्ये सरकारच्या निष्काळजीपणामुळे पाच लाख नव्हे, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर मोदीजींनी आपले कर्तव्य पार पाडत प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची भरपाई द्यावी,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारताने शनिवारी देशातील कोविड मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या एवढ्या विशाल राष्ट्राच्या मृत्यूच्या आकड्यांचा अंदाज लावण्यासाठी अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर केला जाऊ शकत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १६ एप्रिल रोजी ‘जागतिक कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना भारत थांबवत आहे’ या शीर्षकाच्या लेखाला उत्तर म्हणून एक निवेदन जारी केले होते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५५८ वर आली आहे. त्याचबरोबर यामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख २१ हजार ७५१ झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत चार कोटी २५ लाख आठ हजार ७८८ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत चार कोटी ३० लाख ३१ हजार ९५८ लोकांना करोनाची लागण झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0