Mobile phone ban in Office | कार्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी | जाणून घ्या कुणी दिले आदेश! 

Homeadministrative

Mobile phone ban in Office | कार्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी | जाणून घ्या कुणी दिले आदेश! 

Ganesh Kumar Mule Nov 21, 2024 7:27 PM

Pune Helicopter Crash News | पीएमआरडीएच्या बचाव पथकाची हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी धाव
PMRDA Pune | कामकाजाच्या सुलभतेसाठी PMRDA आयुक्तांनी घेतले महत्वपुर्ण न‍िर्णय!
Pune Metro Line 3 | पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पासाठी शंभर टक्के जागा उपलब्ध

Mobile phone ban in Office | कार्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी | जाणून घ्या कुणी दिले आदेश!

PMRDA Pune – (The Karbhari News Service) – कार्यालयीन वेळेत मोबाईलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने न‍िर्धारीत कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असे आदेश पीएमआरडीएमध्ये लागू करण्यात आला आहे. बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाने संबंध‍ित आदेश लागू असून त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे. (Mobile phone use)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. या मंजूर आकृतीबंधातील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत तसेच सरळसेवेच्या पदांची बिंदू नामावली मंजूर होऊन सदरील पदे एमपीएससी व जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. संबंध‍ित पद भरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्तोत्र एजन्सी नियुक्त करून त्यांच्यामार्फत कंत्राटी मनुष्यबळ नियुक्त केले आहे.

या बाह्यस्त्रोत एजन्सीमार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये कार्यरत मनुष्यबाळाकडून कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर होत असल्याने कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. गोपनीयतेचा भंग होऊ नये व कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून कार्यालयीन वेळेत संबंधित कंत्राटी मनुष्यबळाने कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून कंत्राटी एजन्सीकडून त्यांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी पूर्णवेळ कामकाजात व्यस्त राहणार असल्याने कार्यालयीन कामकाजात अध‍िक सुरळीतपणा येण्यास मदत होईल.