MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन 

HomeBreaking News

MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन 

Ganesh Kumar Mule Jun 18, 2025 7:22 PM

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!
Arvind Shinde | PMC Pune | माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून टेंडर प्रक्रिया लांबविणाऱ्या समाज कंटकांवर फौजदारी कारवाई करा | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Covid | कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

MNS on Hindi Language | खबरदार! हिंदी भाषेची पुस्तके छापली आणि वितरित केली तर.. | मनविसेचे बालभारती समोर आंदोलन

 

MNVS – (The Karbhari News Service) –  हिंदी भाषेची पुस्तके बालभारतीने छापली तर तर छपाई आपण बंद करून टाकू. एक ही पुस्तक पुण्यात वितरण करून देणार नाही. जर बालभारती आणि शासनाने पुस्तक छपाई आणि वितरण केले तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी संघर्ष अटळ आहे. असा इशारा मनविसे च्या वतीने देण्यात आला. (Pune News)

मनसेने दिलेल्या निवेदना नुसार १ ली ते ५ वी च्या विद्यार्थांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकण्याबाबत  शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जारी केला. हिंदी भाषा लादायचीच असा पहिल्यापासून च या सरकारचा डाव होता. राज ठाकरे यांनी या हिंदी सक्ती विरोधात सातत्याने राज्य नेतृत्वाला पत्रव्यवहार करून हिंदी ची सक्ती कायमची रद्द व्हावी याकरिता प्रयत्न केले. परंतु १७ जुन ला या राज्य सरकारने शासन निर्णय काढून अप्रत्यक्षपने हिंदी भाषा सक्ती केलेली आहे. हा महाराष्ट्र द्रोही आणि मराठी भाषेला मारक शासन निर्णय आम्हाला मान्य नाही. याबाबत आज  पत्रकार परिषद घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक , पत्रकार, संपादक, साहित्यिक आदींना सदर हिंदी भाषा लादण्याचा सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करायचे आवाहन केले आहे.

म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो मराठी नागरिकांच्या भावनेला समजून आम्ही आज बालभारती ला धडक देऊन हिंदी पुस्तकांच्या छपाई केंद्रावर छापा टाकून मनविसे ने हिंदी पुस्तकांवर शाईफेक करून आपला निषेध नोंदवला, आणि पुस्तक छपाई बंद पाडली,

 

सदर आंदोलनात शहराध्यक्ष धनंजय दळवी, प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांच्यासह राज्य उपाध्यक्ष सचिन पवार,राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश घोलप, अभिषेक थिटे, शहर उपाध्यक्ष परिक्षीत शिरोळे, विक्रांत भिलारे, विभाग अध्यक्ष केतन डोंगरे,आशुतोष माने, शशांक अमराळे, हेमंत बोळगे ,शहर कार्यकारणी सदस्य प्रवीण कदम, विभाग सचिव मंदार ठोंबरे, मयुर शेवाळे, उप विभाग अध्यक्ष करन मेहता, निखिल राजपूत, प्रज्वल अडागळे, ओंकार पवार , निरंजन म्हसवडे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.