MLA Sunil Tingre | लोहगावकरांना पाणी कधी मिळणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष

HomeBreaking Newsपुणे

MLA Sunil Tingre | लोहगावकरांना पाणी कधी मिळणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष

गणेश मुळे Jul 03, 2024 3:58 PM

CM Eknath Shinde | राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत | शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन
MLA Sunil Tingre | प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी | आमदार सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी
Mukhyamantri Majhi ladki Bahin | ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

MLA Sunil Tingre | लोहगावकरांना पाणी कधी मिळणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष

 

MLA Sunil Tingre – (The Karbhari News Service)– महापालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) समाविष्ट झालेल्या लोहगावसह समाविष्ट गावांना अद्याप पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. महापालिकेत येऊनही पाणी, ड्रेनेज, रस्ते या सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाची भावना झाली असल्याचे सांगत त्यावर शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधान सभेत केली. (Vidhansabha Session)

शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील लक्षवेधीवर बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, यांनी समाविष्ट गावांमधील पाणी टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधले, ते म्हणाले, 2017 मध्ये पालिकेत 11 गावांचा तर 2021 ला 23 गावांचा समावेश झाला. मात्र, या गावांमध्ये अद्यापही महापालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत नाही. या गावांमध्ये अद्याप पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था नाही. भामा आसखेड धरणातून माझ्या भागासाठी 2.6 टिएमसी इतका पाणीसाठा मंजुर झाला. मात्र, वितरण व्यवस्थे अभवी माझ्या मतदारसंघातील लोहगाव भागाला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकी, त्यांची वितरण व्यवस्था, ड्रेनेज ही कामे झालेली नाहीत, ही कामे न झाल्यामुळे रस्त्यांची कामे करता येत नाहीत. ही सर्व कामे लवकरात लवकर झाली तर समाविष्ट गावांमधील नागरिकांना महापालिकेत आल्याचे समाधान लागेल असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी शहरातील पाणी गळती कधी पर्यंत रोखली जाईल आणि शहर वाढत असल्याने पाणी पुरवठयासाठी अन्य काही स्त्रोत आपण वाढवत आहोत का अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सर्व भागांना सुरळीत पाणी पुरवठा होईल, तसेच शहरासाठी मुळशीच्या टाटा धरणातून पाणी घेण्याबाबत चाचपणी केली जात असल्याचे सांगितले.
——–