MLA Sunil Kamble | आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

HomePolitical

MLA Sunil Kamble | आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ganesh Kumar Mule Nov 09, 2024 8:58 PM

MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश; ससून रुग्णालयातील  कर्मचाऱ्यांकरीता नवीन वसाहत इमारत निर्मिती सुरू 
Ramdas Athawale | आंबेडकरी समाज एकजुटीने महायुती सोबत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले | सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रॅली
Rajnath Singh | महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

MLA Sunil Kamble | आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Pune Cantonment Vidhansabha – (The Karbhari News Service) – अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या 214 पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची आरोग्यदूत अशी ओळख आहे. सुनील कांबळे यांचा सध्या पदयात्रेच्या माध्यमातून मतदारसंघात नागरिकांशी संवाद सुरू आहे. त्यांच्या या पदयात्रांना युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आमदार सुनील कांबळे यांच्या पदयात्रेची सुरुवात आज प्रभाग 20 मधील  पंचशील चौक ताडीवाला रोड इथून गणपती बाप्पांची आरती करून  सुरुवात झाली. तर लडकत वाडी या ठिकाणी या पदयात्रेचा समारोप झाला.

या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंट चे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट चे या पदयात्रेसाठी राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक प्रदीप दादा गायकवाड, राष्ट्रवादी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) चे बाळासाहेब जानराव,शहर अध्यक्ष संजय सोनवणे,नेते महेंद्र कांबळे,कॅन्टोन्मेंट अध्यक्ष संदीप धांडोरे,भाजपा कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे ,नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती आदी संघटना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील सहभागी झाले.

या पदयात्रेत ठिकठिकाणी फटाके फोडून आमदार सुनील कांबळे यांचे स्वागत करण्यात आले. आरोग्यदूत अशी ओळख असलेल्या कांबळे यांनी कोरोना काळात  कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेकांचे  प्राण वाचविले आहेत. यामुळे पदयात्रेच्या प्रत्येक टप्यावर महिलांच्या वतीने सुनील कांबळे यांचे औक्षण करण्यात येत आहे. सुनील भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहेत अशी भावना व्यक्त करत नागरिक आपली कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0