MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद

HomeBreaking Newsपुणे

MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद

Ganesh Kumar Mule Jun 05, 2023 9:54 AM

Kirit Somaiya : Pune BJP : किरीट सोमय्या यांना जिथे धक्काबुक्की झाली तिथेच होणार जंगी स्वागत!
Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | 31 मे पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करा | वाहतूक नियंत्रणासाठी १२५ वॉर्डनची नियुक्ती करा
Baner-Balewadi | बालेवाडी-वाकड रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करा!| बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात ना. चंद्रकांतदादा पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद

MLA Sunil Kamble | भारतीय जनता पार्टीच्या (BJP) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील (Pune Cantonment Constituency) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ५ जून, २०२३ रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव (Job Fair) व छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार  सुनिल कांबळे, राजेश पांडे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी मेळाव्याला उपस्थित असलेल्या तरूणांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी यंदाच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने तरूण उपस्थित होते. तसेच यावेळी काहीजणांना मेळाव्याच्या एका तासात  नोकरीची संधी उपलब्ध झाली व त्यांना जाग्यावर ऑफर लेटर मिळाल्यामुळे तरूणाई आनंदी झाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी तरूणांशी संवाद साधला असता त्यांनी अशा प्रकारचे महारोजगार मेळावे व मार्गदर्शन शिबिरे वेळोवेळी आयोजित करण्यात यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आमदार सुनिल कांबळे यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश

युवा हा या देशाचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात युवकांच्या कल्याणासाठी अनेक योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. कौशल्य विकास योजना ही त्यापैकीच एक. आज अनेक स्टार्टअप आणि युनिकॉर्नच्या माध्यमातून भारतातील युवा हा नोकरी मागणारा नाही तर रोजगार देणारा झाला आहे. मला आनंद आहे की, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संयुक्त वतीने पं. दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार महोत्सव व छत्रपती शाहू महाराज करिअर
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी हे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या शिबिरात सहभागी सर्व युवांना अनेकानेक शुभेच्छा देतो. तुमच्या उज्वल आयुष्याला आणखी बळ देणारे हे शिबिर ठरो, अशा शुभेच्छा यानिमित्ताने देतो. अशा प्रकारची शिबिरे राज्य सरकार तर्फे संपूर्ण राज्यभर आयोजित केली जात आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी
मोठा पुढाकार घेतला आहे. भाजपा हा जनतेची सेवा करणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या सेवेच्या व्रताला साजेसा असा हा उपक्रम आहे. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

—-

News Title | MLA Sunil Kamble Spontaneous response of youth to Maharojgar Mela and guidance camp